हिंदुत्वाच्या अभिमानाने नवीन युग साकार करू ।।धृ ०।।
नव्या युगाची नव आव्हाने झेलू आपण सहजपणे
मनामनातील संदेहांना दूर करू या यत्नाने
पिढ्या पिढ्यांची दिव्य प्रेरणा कोटी हृदयें पुन्हा भरू ।।१।।
विज्ञानाला साथ देऊ या सत्य युगाच्या ज्ञानाची
वैभवशाली भवितव्याला मानवता अभिमानाची
अणुयुद्धाची नौबत वाजे भारतवर्षा सज्ज करू ।।२।।
व्यक्तित्वाच्या सीमा साऱ्या ओलांडुनी पुढती जाऊ
लाचारी अन दैन्य टाकुनी गौरवगीत नवे गाऊ
पुरुषार्थाची विजयपताका पुन्हा एकदा उंच धरू ।।३।।
चारित्र्याच्या निर्माणाविण समाजजीवन व्यर्थ असे
कर्तव्याची जाणीव नसता प्रगतीलाही अर्थ नसे
दुभंगलेला समाज अपुला भगिरथ यत्ने एक करू ।।४।।
No comments:
Post a Comment