ध्येयावरती लक्ष हवे मजअन्य कोणते लक्ष्य नको
या देशाचे उजळो प्राक्तन याविण दुसरे भाग्य नको
काही नको मज काही नको ।।धृ ०।।
मी संन्याशी फिरतीवरचा कशावरी वर्षाव फुलांचा
ही ध्येयाची घोर तपस्या इथे प्रलोभन अन्य नको ।।१।।
दुःख तप्त ते अमुचे बांधव जीव तुटावा नित्य तयांस्तव
दुरितांचे ते तिमिर जाऊ दे अन्य भाव अंतरी नको ।।२।।
हे भाषांचे विवाद खोटे भेद जळू दे लहानमोठे
एक हृदय हो भारतजननी अन्य भाव अंतरी नको ।।३।।
हि संघाची गंगा पावन भिजवील शतहृदयांचे प्रांगण
बंधूंनो मज शब्द हवा ते हार नको सन्मान नको ।।४।।
No comments:
Post a Comment