उजळू लागले नभ तेजाने तिमिर लागला विरु
भाग्यरवीला परिश्रमाचे अर्घ्य समर्पण करू ||धृ ०||
कधी उपेक्षा कधी हेळणा अपराजित उरी प्रेरणा
सुखभोगाची अम्हा ना तमा अखंड यत्ना करू ||१ ||
अंधारीही जे ना अडले चरण निरंतर पुढेच पडले
तसेच तितुके जरि उजाडले अविचल व्रत आचरु ||२ ||
स्वप्न पाहिले घनअंधारी स्पष्ट दिसे या प्रकाश-प्रहरी
पूर्तिस्तव निश्चये अंतरी ध्येयदिपासी धरू ||३ ||
ही तर केवळ पहाट पावन सुदूर अजूनी ध्येयनिकेतन
ग्राम-नगर-वन गिरीजन मिळवून संघपथा विस्तरू ||४ ||
No comments:
Post a Comment