यश तुझे झळकु दे दिगंतरी तू विसरु नको राष्ट्रास तरी ॥धृ॥
जीवनकलिका पुर्ण फुलू दे पावित्र्याचे तेज चढू दे
देशप्रीतीचा गंध भरु दे जीवन होइ व्यर्थ ना तरी॥१॥
विसर जिवाला नच ध्येयाला विसर घराला नच देशाला
विसरु नको रे परंपरेला उज्ज्वल मनि इतिहास धरी॥२॥
भूल पडावी भ्याडपणाची भूल पडावी अहंपणाची
भूल नको पण कर्तव्याची स्वार्थाची ती भूल बरी॥३॥
धगधगती तत्वावर निष्ठा मान जिवाची हीच प्रतिष्ठा
अनुसरतील जन कळुनी येता तत्वपुजारी खरोखरी॥४॥
No comments:
Post a Comment