Monday, June 15, 2020

५३ . हिंदुत्वाचे बांधुनी कंकण जगी करूया संचार

५३ . हिंदुत्वाचे बांधुनी कंकण जगी करुया संचार 

हिंदुत्वाचे बांधुनी कंकण जगी करुया संचार 
हिंदु अस्मिते हिंदु देवते तव हो जयजयकार ।।धृ ०।।

ऋषीमुनींनी पूर्वसुरींनी परमेशाचा ध्यास घेउनी 
रचिली संस्कृती दिव्य क्षेमकर करण्या जगदुद्धार ।।१।।

देशदेशींच्या विद्वानांनी मुक्त मनाने विनम्र होऊनी 
हिन्दुवृत्तीचा आनंदाने केलासे स्वीकार ।।२।।

हिरण्यकश्यपू जगी मातले धर्मावरती घालती घाले 
निर्दलण्या त्या नरसिंहाचा होऊ दे अवतार ।।३।।

मनामनांतुनी जनाजनातुनी वनावनातुनी नगानगातुनी 
अखंड घुमवू हिंदुत्वाचा तेजस्वी हुंकार ।।४।।

चंद्रसूर्य हे अंबरी जोवरी मानवजाती भूवरी जोवरी 
हिंदुधर्म अन संस्कृती तोवरी चिरविजयी असणार ।।५।।

No comments:

Post a Comment