वाजे नौबत झेंडा फडकत ढोल वाजतो धुम
धिक् तक् तडाड् धुम् दिड् दिड् धुम्
धिक् तक् तडाड् ढोल वाजतो धुम्॥धृ०॥
खुळखुळ लेझिम झन् झन् झांजा खेळ रंगला शूरविरांचा
गुलाल फासुनि धुंद बनोनी लेझिम चाले ताल धरोनी॥१॥
सरसर लाठी भिर भिर काठी येथ वंचिका तेथ उडी
द्वंद चालले हातघाइचे सिंहाचे ते लढती बच्चे॥२॥
तिर्र तुतारी भरे अंबरी जोम वाढला स्फुरण करी
जंगल मंगल जंमत गंमत उत्साहाची उधळत दौलत॥३॥
शिर्र शिट्टि सर्व थांबती जमती सारे झेंड्याभवती
म्हणती प्रार्थना एक दिलाने भारत भूसाठीच जिणे॥४॥
No comments:
Post a Comment