Thursday, June 11, 2020

४६ . सारखी लायकी नको बढायकी

४६ . सारखी लायकी नको बढायकी, कुणी कुणासंग भांडायच नाय ।
गावकीत आमुच्या ठरलंच हाय ।।धृ ०।।

जमीनजुमला गोठ्यातली गाय, कर्जापाण्यापायी इकायची नाय 
मौजेतसुद्धा ताडी नि माडी, आल्यागेल्या संग प्यायाची नाय ।।१।।

चोरी चहाडी वंगाळ पाप, शिकवु कुणाला नका मायबाप 
भलं असावं भलं दिसावं, तमाशा जगाला दावायचा नाय ।।२।।

विठुरखुमाईच्या भक्तीशिवाय, गाऊन डोलून त्या भजनात काय 
सरशी करायला तालासुरांची, डोसक्यात टाळ कुणी घालायचं नाय ।।३।।

गावोगावी संघ सुरुच हाय, संघाबिगर गाव शोभायचं नाय 
आपल्याच गावात नांदायचं थाटात, भिऊनशान आता भागायचं नाय ।।४।। 

No comments:

Post a Comment