Friday, June 26, 2020

९२ . दादान गो बाबान गो

९२ . दादान गो बाबान गो 

दादान गो बाबान गो 
आता मी संघात जाईन गो ।।धृ०।।

माय मने लेक मोठा भैताड झाला 
कामधंदा सोडून श्यान संघात गेला ।।१।।

बाबा मने लेक मा कामातून गेला 
लगन नाही करत म्हने प्रचारक गेला ।।२।।

लेक मने माय तुले ठाऊक नाही 
संघात गेल्याविना धडगत नाही ।।३।।

जातपात आनी गरीब श्रीमंती 
संघात याची नाही गणती ।।४।।

हिंदु हिंदु समदे भावा परमान 
संघात भेटे हे शिकवण ।।५।।

मायबाप-दादा मने लई बेस झाला 
परचारक होवुन लेक सुधरुन गेला ।।६।।

No comments:

Post a Comment