Friday, June 26, 2020

९५ . दिशादिशातुन पुन्हा घुमु द्या

९५ . दिशादिशातुन पुन्हा घुमु द्या

 दिशादिशातुन पुन्हा घुमु द्या

हिन्दुत्वाची ललकारी ॥धृ॥

नभ झाकळले घन मेघांनी
उठता वादळ दाहि दिशांनी
कोसळणाऱ्या जलधारांनी
आग नसे ही विझणारी ॥१॥

परचक्राची कसली भीती
रिपु निर्दालक आमुची कीर्ती
नरसिंहाची प्रकटे शक्ति
अरिचे काळिज चिरणारी ॥२॥

दारिद्र्याची अज्ञानाची
चीड आमुच्या दुर्बलतेची
धर्माची का घडते विक्री
बोच मनी ही सलणारी ॥३॥

उठा हिंदुनो या सांगाती
संघशक्तिची घेउ प्रचीती
पुरुषार्थाची साक्ष तळपते
यशोध्वजा ही डुलणारी ॥४॥

No comments:

Post a Comment