चरण चालु दे सदा ध्येयमंदिराकडे
अंतरात आमुच्या स्मृती तुझीच जागु दे ।।धृ ०।।
गती मती द्युती तुझी आमुच्यात येऊ दे
सुखात आणि संकटी तुझा मनास ध्यास दे
गतीस खंड त्या नको अम्ही असू सदा खडे ।।१।।
पाहुनि सभोवती दुःख दैन्य आपदा
जाणुनी स्वयेच तू त्यागिलीस संपदा
दंभ मोह लाजले पाहता तुझ्याकडे ।।२।।
चरण धुंद चालु दे वेग त्यास येउ दे
ध्येयमंदिरावरी दृष्टी अढळ राहु दे
कवच घालुनी स्मृती सिद्ध संगरा खडे ।।३।।
धूलिच्या कणातुनी घोष हा उठे महा
स्पर्श होऊनि तुझा देह धन्य हो अहा
वाट पाहता युगे अशी विभूती सापडे ।।४।।
No comments:
Post a Comment