मंत्र छोटा तंत्र सोपे, परी यशस्वी ठरले ते
रीत साधी शिस्त बांधी, कार्य व्यापक उभवीते ।।धृ ०।।
व्यक्ती व्यक्ती जमवुनी भवती, जागृत करणे तयाप्रती
मनात प्रीती हृदयी भक्ती, संघटनेने ये शक्ती ।।१।।
असोत जाती नाती गोती, नसे तयांची आम्हा क्षिती
नकोच कीर्ती नको पावती, सेवा करणे निस्वार्थी ।।२।।
हिंदू अवघा बंधू बंधू, भारतभूचा पुत्र असे
वंदुनी माता गौरव गाथा, सार्थक त्याचे होत असे ।।३।।
युगायुगातून इतिहासातून, पराक्रमाची परंपरा
दरीदरीतून मैदानातून, चिरस्फूर्तिचा इथे झरा ।।४।।
No comments:
Post a Comment