हिंदुत्वाचा वसा घेऊनी जाऊ सारे अवती भवती
देशासाठी अर्पू जीवन स्वर्ग उतरवू अवनीवरती ||धृ ० ||
भेदरहित हा समाज बांधू आत्मीयतेने सौहार्दाने
समरसतेचा मंत्र आचरु आपुलकीच्या व्यवहाराने
कार्यव्याप्तिच्या दिशा उजळल्या अथक चालूया पुढती पुढती ||१ ||
संघ शक्तीच्या परिणामाने ध्येयप्राप्तीची चिन्हे दिसती
समाधान ना त्यात असावे निष्ठा अविरत कार्यावरती
सहभागाने सकल जनांच्या परिश्रमांची वाढो महती ||२||
क्रियाशीलता उत्तर आहे भविष्यातल्या शतप्रश्नांचे
क्रियाशीलता उत्तर आहे भविष्यातल्या शतप्रश्नांचे
संघटनेच्या आधारावर फिरवू वारे तूफानाचे
मातृभूमिच्या चिरविजयाची एक सुराने गाऊ कीर्ती ||३ ||
No comments:
Post a Comment