Wednesday, June 17, 2020

६४ . भारताचिया महारथा या

६४ . भारताचिया महारथा या

भारताचिया महारथा या सारे मिळुनी ओढू या 
पायी गती अन हाती शक्ती हृदयी भक्ती जोडू या ।।धृ ०।।

ध्येयपथावर डोळे खिळवू श्वासांमध्ये निश्चय मिळवू 
परस्परांच्या चालींमध्ये एकतानता साधू या ।।१।।

व्यक्तिजीवना लगाम घालू समष्टीमध्ये क्षण क्षण तोलू 
सममूल्यांची समरसतेची ध्वजा अलौकिक उभवू या ।।२।।

वैभववेड्या टापा टापा समूर्त त्यागा नकोच थापा 
जीवनसाधन कर्मफळाविण अखंड यात्रिक होऊ या ।।३।।

कोण रथी अन कोण सारथी कसली चर्चा हि वैय्यर्थी 
परमपवित्रे जीवनसूत्रे रथचक्रांना बांधू या ।।४।। 



No comments:

Post a Comment