समाजजीवन भारुनि टाकू चैतन्याने मानाने
वैभवशाली भवितव्याला नटवू निजकर्तृत्वाने ।।धृ०।।
दशशतकांचे दैन्य टाकुनी जागृत करू या जनशक्ती
पराक्रमाची अन प्रतिभेची जगास दावू अभिव्यक्ती
राष्ट्रपुरुष हा सुदृढ करूया पुन्हा एकदा यत्नाने ।।१।।
सागरलाटा रोज सांगती नव्या युगाची आव्हाने
गिरिशिखरांतुनि ऐकू येती मायभूमीची जयगाने
हि आव्हाने पेलायला पुढे राहुया यत्नाने ।।२।।
परिश्रमाचा सेतू बांधू संघटनेच्या दलभारें
नको कुणाची कृपा आपणा आक्रमू धरती नभ सारे
कळीकाळावर मात करूया तेज भारल्या भक्तीने ।।३।।
ध्येयभावना वरती काढू समतेची गाथा गाऊ
उच्चनीचता गाडुनी टाकू नवी दिशा नव गती देऊ
व्यक्ती व्यक्तीच्या कर्तृत्वाला उधाण आणू सहजपणे ।।४।।
No comments:
Post a Comment