Thursday, June 11, 2020

४७ . आम्ही गड्या डोंगरचं रहाणारं

४७ . आम्ही गड्या डोंगरचं रहाणारं

आम्ही गड्या डोंगरचं रहाणारं
चाकर शिवबाचे होणार॥ध्रु॥

निशाण भगवे भूवर फडके
शत्रूचे मग काळिज धडके
मावळे आम्हीच लढणार ॥१॥

तानाजी तो वीरच मोठा
लढता लढता पडला पठ्ठा
परि नाही धीरच सोडणार ॥२॥

धनाजी जाधव रणात दिसता
शत्रु पळे प्रतिबिंब पाहता
घोडं नाही पाणीच पिणार ॥३॥

बाजीराव तो वीरच मोठा
कणसं खाउनि लढला पठ्ठा
घोडं तो दौडीत सोडणार ॥४॥

जगदंबेच्या कृपाप्रसादे
संघाचीया आशीर्वादे
म्होर म्होर आम्हीच जाणार ॥५॥

No comments:

Post a Comment