क्रांतदर्शी केशवांनी दिव्य स्वप्ना पाहिले
भरतभूचे तेज अवघे दश दिशांना फाकले ।।धृ ०।।
जागला पुरुषार्थ येथे प्रकटली जाज्वल्य निष्ठा
चेतली कोटी मने ही टाकुनी खोट्या प्रतिष्ठा
विकसणाऱ्या या मनांना संघसूत्री गुंफले ।।१।।
विकसले अध्यात्म येथे वेदही व्यवहार होती
बहरले विज्ञान येथे देउनी सारी कसोटी
विकसणारे ज्ञान तेही संघसूत्री बांधले ।।२।।
बंधुतेचे श्रेष्ठ नाते हृदय हृदया जोडिते
भेदभावा तोडुनिया ऐक्य येथे नांदते
एकतेची हि तुतारी केशवाचा मंत्र बोले ।।३।।
No comments:
Post a Comment