या कणकणातुन दिव्य तेज प्रकटेल
हे राष्ट्र पुन्हा विश्वात अजिंक्य ठरेल ।।धृ०।।
श्रीराम कृष्ण आदर्श इथे अवतरले
भगवान बुद्ध तीर्थंकर येथे झाले
श्रेठत्व जगाने मान्य तयांचे केले
ते क्षण भाग्याचे पुन्हा पुन्हा येतील ।।१।।
जातिपंथ भाषा नको वृथा अभिमान
भेदांच्या भिंती पडोत सर्व गळोन
निद्रेतून व्हावा जागा हिंदुस्थान
हे तेज जगाला निःसंशय दिपवील ।।२।।
आसाम असो पंजाब असो बंगाल
तो महाराष्ट्र वा कर्नाटक तामिळ
हा अखंड भारत परि आसेतु हिमाचल
विविधतेतुनी एकता इथे प्रकटेल ।।३।।
हा समाज अपुला ध्येयापासुनि ढळला
हिंदूच हिंदुच्या विरोधात उठलेला
परकीय शक्तिचा स्वार्थी हस्तक बनला
कष्टाने अमुच्या देशभक्त होईल ।।४।।
राष्ट्राचा करण्या घात कुणी धजतील
परकीय शक्तिला साथ कुणी देतील
बलदंड राष्ट्र त्या प्रत्युत्तर देईल
हा संघशक्तिचा साक्षात्कार घडेल ।।५।।
No comments:
Post a Comment