Saturday, June 6, 2020

३८ . उठा राष्ट्र्वीर हो

३८ . उठा राष्ट्र्वीर हो

उठा राष्ट्र्वीर हो

सज्ज व्हा, उठा चला, सशस्त्र व्हा, उठा चला॥धृ॥

युध्द आज पेटले जवान चालले पुढे
मिळूनि सर्व शत्रुला क्षणांत चारु या खडे
एकसंघ होउनि लढू चला लढू चला ॥१॥

लाख संकटे जरी उभी समोर ठाकली
मान ताठ आमुची कुणापुढे न वाकली
थोर वंश आपुला महान मार्ग आपुला ॥२॥

वायुपुत्र होउनी धरु मुठीत भास्करा
होउनी अगस्तिही पिऊनि टाकु सागरा
मन्युबाळ होउनी रणात जिंकू मृत्युला ॥३॥

चंद्रगुप्त वीर तो फिरुनि आज आठवू
शूरता शिवाजिची नसानसात साठवू
दिव्य ही परंपरा अखंड चालवू चला ॥४॥

यज्ञकुंड पेटले प्रचंड हे सभोवती
दुष्ट शत्रू मारुनी तयास देउ आहुती
देवभूमि ही अजिंक्य दाखवू जगा चला ॥५॥

No comments:

Post a Comment