Saturday, June 6, 2020

३५. धवल यशाचे पाईक आम्ही पणाला लावू

३५. धवल यशाचे पाईक आम्ही प्राण पणाला लावू

धवल यशाचे पाईक आम्ही प्राण पणाला लावू
कीर्ति यशःश्री आणू खेचुन समाजचरणी वाहू॥धृ॥

या मातेच्या भालावरती हिमरत्नांचा किरिट
या जननीचे चरण क्षाळते महासिंधुची लाट
चंद्रसूर्यही किरण जलाने रोज घालती न्हाऊ॥१॥

या जननीच्या उदरी येती सजीव उज्ज्वल रत्ने
दृढव्रती ते पुत्र आणती सुरगंगेला यत्ने
याच भूमिला फुलवित हसवित नद्या लागती वाहू॥२॥

कृतान्त आम्ही सहज नाशिले दैत्य मदोन्मत्त
सहज सुकोमल भाव फुलविले दगडा धोंड्यात
जगतामध्ये कल्पतरुंचे सुंदर उपवन फुलवू॥३॥

पराभवाचे जहर पचविले नीलकंठ आम्ही
युगायुगाचे दुर्जन हरले धरतीचे स्वामी
देवद्वेष्टे आम्ही हरविले आम्ही वीरबाहू॥४॥

जगतामध्ये सौख्य नांदवू हीच प्रतिज्ञा मनी
अणुरेणूही निर्मल व्हावा आकांक्षा जीवनी
अशुभ जळावे शुभ नांदावे ह्यास्तव जीवन घडवू॥५॥

No comments:

Post a Comment