छत्रपती शिवरायांचा त्रिवार जयजयकार ।।धृ ०।।
हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधुनिया गाजवि समरांगण
आई भवानी प्रसन्न होऊन देई साक्षात्कार ।।१।।
धर्माचा अभिमानी राजा देशाचा संरक्षक राजा
चारित्र्याचा पालक राजा घडवी देशोद्धार ।।२।।
स्फूर्तिकेंद्र हे भारतियांचे दैवत आम्हां नवतरुणांचे
आद्यप्रवर्तक संघटनेचे सदा विजयी होणार ।।३।।
पूजा बांधू सामर्थ्याची इच्छापूर्ती श्रीशिवबाची
उठता उर्मी समर्पणाची काय उणे पडणार ।।४।\
प्रभात झाली लोकशाहीची जाणीव होई कर्तव्याची
घेऊ प्रतिज्ञा एकजुटीची नको आता माघार ।।५।।
कितीक झाले आणि होतील राजे असंख्य जगती
परि न शिवबा समान होईल या अवनी वरती
राजे छत्रपती ।।६।।
No comments:
Post a Comment