विश्वासाने सदैव गगनी ध्वज भगवा नाचे ॥धृ॥
कंकण सत्कार्याचे बांधुन युगायुगांचे फेडू या ऋण ।
होते ते दृढ तुटले बंधन जाचक सत्तेचे॥१॥
समस्या न परि सरल्या अजुनी भरल्या वाटा या काट्यांनी।
धैर्ये टाकू सर्व मिळोनी पाउल या पुढचे॥२॥
शब्द मोजके कृती प्रभावी काल सुमंगल घडविल भावी।
त्यागाविण का तसेच जीवन कधि विलसायाचे ॥३॥
उत्कर्षाचा ध्यास धरोनी प्रतिपच्चंद्र जसा ये गगनी।
तसेच जीवन आकांक्षांनी भरु एकेकाचे ॥४॥
अजिंक्य व्हावा अखंड भारत मूर्त करु हे थोर मनोरथ।
विश्वासाने सदैव गगनी ध्वज अपुला नाचे॥५॥
No comments:
Post a Comment