एकदिलाची सिंहगर्जना दिशादिशातुन घुमते रे
परचक्रची भीती कशाची चक्र सुदर्शन फिरते रे॥धृ॥
सोन्याची रे लंका जळली रावण वधिला सीता सुटली
पतीव्रतेच्या शीलासाठी रामायण हे घडते रे॥१॥
सत्यासाठी पांडव लढले जगावेगळे समर रंगले
महाभारती कृष्ण सारथी युध्द करा हे वदतो रे॥२॥
रणी धुरंधर प्रताप राणा अभिमानाचा त्याचा बाणा
आणि इमानी चेतक घोडा अरिवरि तुटुनी पडतो रे॥३॥
सिंहगडावर सिंह झुंजला पावन खिंडित बाजी लढला
झाशीवाली राणी आमुची देशासाठी लढते रे॥४॥
त्याग असा रे अपूर्व अपुला बलिदानाचा दिव्य सोहळा
भारतमाता कौतुक करते ज्योत भक्तिची जळते रे॥५॥
अजिंक्य हिंदू अजेय भारत अशी घोषणा नभास भेदित
हिमालयाच्या शिखरावरती ध्वजा आमुची डुलते रे॥६॥
No comments:
Post a Comment