Friday, June 5, 2020

३४ . नौजवान सैनिका उचल पाऊला

३४ . नौजवान सैनिका उचल पाऊला 

नौजवान सैनिका उचल पाऊला 
पुढे चला पुढे चला ध्वनी निनादला ।।धृ ०।।

मायदेश आपुला स्वतंत्र जाहला 
उच्च कीर्ती शिखरि चढविण्यास त्याजला 
व्हा तयार ! व्हा हुशार ! घोष जाहला ।।१।।

शिवाजी शूर बाजी वीर बापु गोखले 
प्रताप थोर समरवीर अमर जाहले 
ती उदात्त भव्य दिव्य स्मर परंपरा ।।२।।

टिळक केशव नरेंद्र थोर अग्रणी
रंगले स्वदेशकार्यी स्वार्थ त्यागुनी 
त्यासमान देव मान देश आपुला ।।३।।

मार्ग तव तुला जरि भयाण वाटला 
विपत्तिचा गिरी जरी समोर ठाकला 
बेधडक तू दे धडक नि फोड त्याजला ।।४।।


No comments:

Post a Comment