Sunday, June 28, 2020

११० . अजिंक्य आहे नरसिंहांचा देश

११० . अजिंक्य आहे नरसिंहांचा देश

अजिंक्य आहे नरसिंहांचा देश॥धृ०॥

उसळले रक्त हे पुन्हा अगस्तिऋषीचे
सळसळले उज्ज्वल शौर्य भीष्मभीमाचे
रसरसले तेजहि प्रताप गोविंदांचे
श्री शिवरायाचा दुमदुमला आवेश ॥१॥

हे उधाण आले पुनः शक्तिसिंधूला
धगधगल्या ह्रदयी स्वातंत्र्याच्या ज्वाला
प्रत्येक वीर प्रलंयकर रुद्रच गमला
प्रत्येक चढवितो रणवीराचा वेष ॥२॥

नेत्रातुन झडतो प्रलयीचा अंगार
अन् नसानसांतून बिजलीचा संचार
आकाशा चिरते विजयाची ललकार
मृत्युंजय सजले घ्याया रिपुचा घास॥३॥

निज शिरा घेउनी आपुल्याच हातात
आईस्तव लढते धडही संग्रामात
झुंजता रिपुंशी बनुनी झंझावात
मर्दाचा जोवर अखेरचा तो श्वास॥४॥

सर्पांनो येथे गरुडसैन्य जमलेले
श्वानांनो येथे सिंहसैन्य सजलेले
गवतांनो येथे वणवे हे धगधगले
हे श्येन सुसज्जित करण्या कपोतनाश ॥५॥









No comments:

Post a Comment