Wednesday, June 17, 2020

५९ . जय भवानी जय शिवराय

५९ . जय भवानी जय शिवराय 

जय भवानी जय शिवराय ।।धृ ०।।

तू रक्षियले देशाला, न्यायनीती आदर्शाला 
तू जागविले धर्माला ।।१।।

दुष्ट आक्रमक लोळविले, सज्जनास तू वाचविले 
राज्य आपुले स्थापियले ।।२।।

जातपात तुज मान्य नसे, प्रांत भेद तुज ठाव नसे 
हिंदु धर्म हा भाव असे ।।३।।

देशाच्या एकत्वाचे, ध्येयपूर्तता करण्याचे 
राज्य हिंदवी मोलाचे।।४।।

महापराक्रमी तूच खरा, राजनीती चाणक्य खरा 
त्यागाचा आदर्श खरा ।।५।।

तू प्रेरक नवतरुणांचा, तू प्रतीक चारित्र्याचा 
राष्ट्रपुरुष या देशाचा ।।६।।

शिवरायांचा जयजयकार, जिजामातेचा जयजयकार
भारतभूचा जयजयकार ।।७।। 

No comments:

Post a Comment