रक्षणार्थ ठाकुनी उभे चहूकडे
करु समर्थ हा समाज होउनी पुढे॥धृ०।।
अन्नवस्त्र अल्पसे आसरा नसे पुरा
जाहला नसे प्रबुध्द देश हा खराखुरा
सिध्दीस्तव कष्टांचे शिंपुनी सडे॥१॥
भक्तिहीन वॄत्तिचे शक्तिहीन बापुडे
जन्मती नांदती नष्ट होति बुडबुडे
जागत्या जनार्दनास घालु साकडे॥२॥
सद्गुणी पराक्रमी आपुल्या पिढ्या पिढ्या
दुर्दिनास पचवुनी राहिल्या सदा खड्या
सांगतात नौबती सांगतात चौघडे॥३॥
व्यक्ति व्यक्ति भिन्नता ती मतस्वतंत्रता
घडवु त्यातुनी समर्थ स्नेहशील एकता
एकसूत्र सर्व लोक करुनिया खडे॥४॥
नांदवून शांतता फुलवुनी समृध्दता
नाव सार्थ हे करु सुवर्णभूमि भारता
चालणे चालणे चालणे पुढे पुढे॥५॥
No comments:
Post a Comment