पेटली जरी कुडी तरी हसायचे
संघकार्य ना कधी विझून जायचे ।।धृ०।।
हि कृपा कुणाची ना वाढलो आम्ही
लाचारी पत्करली ना कधी आम्ही
दाविले जगून ते कसे जगायचे ।।१।।
छळ निंदा उपहासा वंदिले आम्ही
लढणाऱ्या मृत्युला जिंकिले आम्ही
झुंज देउनि पुन्हा पुन्हा उठायचे ।।२।।
दैत्य ठाकले समोर शस्त्र घेउनी
संगिन जरि छातीवरी रोखिली कुणी
ठोके हे हृदयाचे ना चुकायचे ।।३।।
राज्य चालवो कुणी खंत ना मनी
टाकुनी शिते भुते नाचवो कुणी
मात्र आम्ही ठरविले फकीर व्हायचे ।।४।।
केशवास भेटताच सदन सोडले
माधवास पाहताच सर्व अर्पिले
एक दिवस मंत्र गात विजयी व्हायचे ।।५।।
No comments:
Post a Comment