वेदमंत्राहूनि आम्हा वंद्य वंदे मातरम ।।धृ ०।।
माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती
त्यात लाखों वीर देती जीवितांच्या आहुती
आहुतीने सिद्ध केला मंत्र वंदे मातरम ।।१।।
याच मंत्राने मृतांचे राष्ट्र सारे जागले
शस्त्रधारी निष्ठुरांशी क्रांतिवादी झुंजले
शस्त्रहीना एक लाभे शस्त्र वंदे मातरम ।।२।।
निर्मिला हा मंत्र ज्यांनी आचरीला झुंझुनी
ते हुतात्मे देव झाले स्वर्गलोकी जाउनी
गा तयांच्या आरतीचे गीत वंदे मातरम ।।३।।
No comments:
Post a Comment