Thursday, June 18, 2020

६७ . नसानसांतुनी वाहू लागले चैतन्याचे रक्त नवे

६७ . नसानसांतुनी  वाहू लागले चैतन्याचे रक्त नवे 

नसानसांतुनि  वाहू लागले चैतन्याचे रक्त नवे 
घडवू अमुच्या कर्तृत्वाने भारतभूचे रूप नवे ।।धृ ०।।

अंधःकारी भयाण भेसूर अवसेची ती सरली रात 
एकोप्याची गुढी उभारू जीर्ण रूढींची टाकुनी कात 
समानतेचा मंत्र आमुचा त्यागाचे नित दान हवे ।।१।।

कर्तृत्वाची जाणीव ठेउनी कष्टांची नच खंत करू 
या देशाच्या उज्वलतेस्तव रात्रीचाही दिवस करू 
जे जे स्वार्थी दांभिक त्यावर जागृततेने लक्ष हवे ।।२।।

सदा असावे ओठी आपुल्या भारतभूचे गौरवगान 
नीतीवरती श्रद्धा ठेउनी सर्वांचाही राखू मान 
दारिद्र्यासह अज्ञानाचे उच्चाटन करण्यास हवे ।।३।।   


No comments:

Post a Comment