हिंदु सारा एक मंत्र हा दाही दिशांना घुमवू या
धरती नभ पाताळही भारू प्राण पणाला लावू या ।।धृ ०।।
समाज रसरसता अर्वाचिन पुनः निर्मुया यत्नाने
खचलेला अभिमान जागवू पिचली ह्रदये सांधूया ॥१॥
चारित्र्याच्या आधारावर हिंदुराष्ट्र हे नव उभवू
समन्वयाने नम्रपणाने विद्रोहाला शमवूया ॥२॥
अन्न-वस्त्र-संस्कार लाभही सहजपणे सर्वा व्हावा
हीच एकता, समता, ममता, पथ ऐक्याचा चालूया ॥३॥
परंपरा, इतिहास, पराक्रम आठव नुसाता व्यर्थ असे
कोटी मनांना सवे घेऊनी वैभव सारे मिळवू या ॥४॥
देशद्रोही निष्प्रभ होतील, दर्शन घडता शक्तिचे
विचार येतील अमरत्वाचे सर्व जगाला देऊया ॥५॥
मायभूमीच्या पायी वाहू ओंजळ निज कर्तृत्वाची
अग्निपरिक्षा कोणी घेता सुवर्ण तेजे तळपुया ॥६॥
No comments:
Post a Comment