Friday, July 17, 2020

१७१ . ध्वजपुजनी असावी निस्वार्थस्वरुप सेवा

१७१ . ध्वजपुजनी असावी निस्वार्थस्वरुप सेवा

ध्वजपुजनी असावी निस्वार्थस्वरुप सेवा ॥धृ०॥

रक्तात तेच भिनले चित्तात तेच रुजले
बल त्यातुनीच वाढे नच माहिती विसावा ॥१॥

उसनी नकोच शक्ती दुबळी तशीच भक्ती
खंबीर सेवकांनी बहरुन देश यावा॥२॥

उत्स्फूर्त ध्येयमार्गी बल पाशवी प्रभावी
फिरवू शके न मागे हा मंत्र एक गावा॥३॥

परकीय संस्कृतीने जरि शोषिले मदाने
नवतेज घेउनीया ध्वज त्यातुनी उठावा ॥४॥

भरल्या दिशांत दाही रणगर्जना कशाही
उसळून झेप घालू हिंदू न हा नमावा॥५॥

सर्वस्व जे सुखाचे क्षण सर्व चेतनेचे
अर्पुनिया ध्वजाला ध्वजकीर्ति वाढवूं या॥६॥

No comments:

Post a Comment