कोटि मनांचा अमृत सागर आज गर्जतो घोष शुभंकर॥धृ०॥
या घोषातुन आज प्रगटले स्वप्न सुमंगल ह्र्दयामधले
पराक्रमाचे तेज उसळले चैतन्याने भरले अंबर॥१॥
ध्यास घेउनी संघशक्तिचा मातृभूमिच्या चिरविजयाचा
हासत चालू पथ ध्येयाचा उधळित स्फूर्ती कणाकणावर॥२॥
जे जे मंगल उदात्त सुंदर अमर तयाचे उभवू मंदिर
दानवतेला इथे न अवसर सामर्थ्यावर राहू निर्भर॥३॥
अनंतरुपे तो विश्वंभर अवतरला या मंगलभूवर
जीवनपुष्पे उधळु त्यावर जिवंत पूजन हेच खरोखर॥४॥
कोटि भुजांची अजिंक्य शक्ति कोटि मनांची उत्कट भक्ती
माधव असता अम्हा संगती विजयाचे वरदान निरंतर॥५॥
No comments:
Post a Comment