करी बांधु या पवित्र कंकण॥ धृ०॥
इतिहासाच्या पानोपानी पूर्व दिव्य ते बसले लपुनी
रम्य भविष्याची त्यामधुनी भव्य मंदिरे पुनश्च उभवुन॥१॥
निजरुधिराची अर्घ्ये अर्पुन ज्यांनी केले स्वराष्ट्रपूजन
कॄतज्ञतेने तयांस वंदुन कर्तव्याचे करु जागरण॥२॥
स्वार्थाचे ओलांडुन कुंपण व्यक्तित्वाचा कोषहि फोडुन
विसरुन अवघे अपुले मीपण विराट साक्षात्कार जागवुन॥३॥
जो हिंदू तो अवघा माझा घोष एक हा फिरुन गर्जा
मुक्तिमार्ग हा एकच समजा अन् सर्वांना द्या समजावुन॥४॥
ध्वजराजाला साक्ष ठेवुनी आज बोलु या निश्चयवाणी
शुभसंकल्पा हीच पर्वणी राहिल निष्ठा उरी चिरंतन॥५॥
No comments:
Post a Comment