पाडुनिया तट भेदांचे हिंदुत्व गर्जुनी उठले
सामाजिक पुरुषार्थाचे युग संघाचे अवतरले ।।धृ०।।
तो केशव व्यक्ती नव्हती ती समूर्त प्रतिभा होती
एकात्म राष्ट्रपुरुषाची ती सगुण साधना होती
दधीचीच्या आत्मबलाने नव सामगान दुमदुमले ।।१।।
हिंदुत्व प्रेरणा अमुची हिंदुत्व धारणा अमुची
हिंदुत्व सचेतन व्हावे ही संघभावना अमुची
हा मंत्र केशवे दिधला यशगीत तयाचे झाले ।।२।।
जनजीवन घडवायाचे आकांक्षा चिरविजयाची
भारतभू विजयी व्हावी दिग्विजयी पूर्व पिढ्यांची
अभिमानी परंपरेचे ध्वज विजयी गगनी चढले ।।३।।
संपन्न समाज असावा सन्मानित जगती व्हावा
समतेचा एकत्वाचा श्वासातच ध्यास वसावा
व्यक्तीचे भान सरोनी देशाचे नाते उरले ।।४।।
संकल्प असे प्रगतीचा समतेसह उत्थानाचा
हिंदूंच्या जागरणाने आव्हाने झेलायचा
नवभारत निर्मायाचा हे स्वप्न सनातन अपुले ।।५।।
No comments:
Post a Comment