Tuesday, July 7, 2020

११७ . विकसित व्हावे अर्पित होऊनि जावे

११७ . विकसित व्हावे अर्पित होऊनि  जावे 

विकसित व्हावे अर्पित होऊनि  जावे ।।धृ०।।

परिसरातल्या अणुरेणूतुन अविरत वेचुनी तेजाचे कण 
रसगंधाशी समरस होऊनि हृदयकमल फुलवावे ।।१।।

सुंदर मी परि नच शोभेस्तव जनहित हेतुक मम बल वैभव 
समष्टिसाठी सकळही सौष्ठव हे नित हृदयी धरावे ।।२।।

दीप असो मी उजळाया तम असे जाणुनी होऊनि निर्मम 
कणकण देउनी जळता क्षणक्षण आसमंत उजळावे ।।३।।

रुपरंग वा असो गंधही यातील माझे काहिच नाही 
श्रेयाचा मम नको लेशही निर्माल्यात विरावे ।।४।।

1 comment: