Tuesday, July 7, 2020

११४ . आसेतु हिमाचल इथला हिंदू हिंदू माझा आहे

११४ . आसेतु हिमाचल इथला हिंदू हिंदू माझा आहे 

आसेतु हिमाचल इथला हिंदू हिंदू माझा आहे
भारतीय जनसिंधूतील बिंदू बिंदू माझा आहे ।।धृ०।।

या पवित्रतम देशाचा मी सेवक पाईक भक्त 
या पवित्रतम धर्माचे वाहते नसांतुनी रक्त 
जो इमान या मातीशी बंधू बंधू माझा आहे ।।१।।

असतील विविध जरि पंथ असतील विविध जरि भाषा 
सानथोर भेद न केव्हा साऱ्यांच्या एकच आशा 
शक्तिशाली गरुड खगाला पंख पंख माझा आहे ।।२।।

हे इथले पर्वत सरिता सूर्य चंद्र अंबर वारा 
ऋतु वसंत प्रिय मज इथला प्रिय इथल्या पाऊस धारा 
फुलबाग फुले भवताली गंध गंध माझा आहे ।।३।।

हि ज्योति संस्कृती जपुया या करा कोट छातीचे 
जनकल्याणास्तव अवघ्या तोडुया बंध जातीचे 
हा सहस्रबाहू भारत बाहु बाहु माझा आहे ।।४।।

हिंदू हिंदू मिळवू सारा होऊया पुन्हा बलशाली 
करू समर्थ भारत जगती कीर्तिवंत गौरवशाली 
या कणकणाला जुळवू हा कणकण माझा आहे ।।५।।

मी देईन तनमनधन हे माझ्या प्रिय देशासाठी 
कर्तृत्व पराक्रम विद्या प्रिय माझ्या देशासाठी 
जन जागरणास्तव अविरत ध्यास ध्यास माझा आहे ।।६।।

1 comment: