स्नेहसूत्र हे करी धरावे
संघटनेला ह्रदय वहावे॥धृ०॥
बंधुत्वाचे विस्मृत नाते
ह्रदयी अमुच्या आज जागते
तेच निरंतर जगवायाते
श्रध्देचे वरदान मिळावे॥१॥
मणिबंधावर जर हे कंकण
तर ह्रदयांतिल उजळे कणकण
नैराश्याचा तिमिर झुगारुन
तेजोमय मनमंदिर व्हावे॥२॥
अखंड निष्ठा दृढ अनुशासन
प्रलब संयमित घडविल जीवन
सहज कुठेतरि घडता स्पंदन
घरोघरी स्वर तेच उठावे॥३॥
सुखदुःखाची समान जाणिव
या भूमीचे घडविल वैभव
वीरव्रताचा करण्या आठव
रक्षाबंधन अमर रहावे॥४॥
No comments:
Post a Comment