भरतभूमीच्या हृदयांतरीचे इप्सित पूर्ण करावे
समर्पणातून अमुच्या येथे राष्ट्र महान घडावे ।।धृ०।।
शतशतकांची उसासणारी मनी अस्फुट वेदना
पराभवाची गाथा गाते उदासवाणी करुणा
दीर्घकालचे शल्य हरावे मनीचे आर्त पुरावे ।।१।।
आज चालली कितिक पाऊले ध्येयपथावरती
परिश्रमातुन यांच्या येईल स्वर्ग धरेवरती
संघशक्तीच्या सामर्थ्याने हिणकस दुरित जळावे ।।२।।
या भूमीचे दैन्य हरावे कुणीही नसावे पतित
कणकण येथील सुवर्ण व्हावा निर्झर अमृत भरीत
श्रीरामाच्या देशामध्ये पावन मंगल व्हावे ।।३।।
No comments:
Post a Comment