Friday, July 10, 2020

१४५ . आक्रमकांशी झुंझत झुंझत समरी विजयी होउ चला

१४५ . आक्रमकांशी झुंझत झुंझत समरी विजयी होउ चला

आक्रमकांशी झुंझत झुंझत समरी विजयी होउ चला

आक्रमणा नच साहिल भारत गर्जुनि सांगू जगताला॥धृ०॥

उन्नत शिखरे हिमालयाची
पवित्र श्रध्दास्थाने अमुची
प्राणपणाने रक्षायाची
हीच प्रतिज्ञा आता अमुची देइल आम्हा विजयाला॥१॥

दे जगदंबे तलवारीला
देइ शंकरा पाशुपताला
योगेश्वर द्या सुदर्शनाला
या अस्त्रांनी दानव मर्दुनि अखंड रक्षू सीमेला॥२॥

स्वातंत्र्याचे करण्या रक्षण
सामर्थ्याचे करु संवर्धन
हासत करुनी प्राणसमर्पण
उंच उभवु या भूमितलावर भारत - भू - अभिमानाला॥३॥

कोटिकोटि मनगटे उभारुन
आक्रमणा या काढू ठेचुन
कोटिकोटि कंठातुन गर्जुन
विजयश्रीने मंडित करु या सदैव भारतजननीला॥४॥

No comments:

Post a Comment