Tuesday, July 14, 2020

१६३ . मनामनातील दुवा सांधण्या

१६३ . मनामनातील दुवा सांधण्या 

मनामनातील दुवा सांधण्या संघटना हे एकच साधन ।।धृ०।।

जाती भाषा पंथभेद किती वैचित्र्याने नटली सृष्टी 
परी एकता स्फुरण्या त्यातुन संघटना हे एकच साधन ।।१।।

सत्य अहिंसा शब्दच ठरले कृतीतून पण शून्यच उरले 
हिंदुत्वाचे ठरण्या भूषण संघटना हे एकच साधन ।।२।।

चारित्र्याविण जीवन कसले देवाविण का मंदिर सजले 
स्वये स्थापिण्या ते अनुशासन संघटना हे एकच साधन ।।३।।

छिन्नभिन्न हा समाज होता विश्वासही मग लोप पावता 
सहकार्याचे जगण्या जीवन संघटना हे एकच साधन ।।४।।

आत्मविस्मृती दूर सारुनी मानवतेची मूल्ये स्थापुनि 
राष्ट्रहिताचे करण्या चिंतन संघटना हे एकच साधन ।।५।।

No comments:

Post a Comment