हिंदुत्व विश्वमंत्र देऊ नव्या युगाला
हिंदू अजिंक्य सांगू गर्जुनीया जगाला ।।धृ०।।
हिंदुत्व हाच प्राण हिंदुत्व हे निधान
शिव सत्य सुंदराचे हाती असे निशाण
पुरुषार्थ भारताचा त्यागात रंगलेला ।।१।।
समता समन्वयाचे अभिमान अस्मितेचे
संपन्न हिंदुराष्ट्र हे दिव्य स्वप्न अमुचे
साफल्य जीवनाचे सन्मान त्यात सगळा ।।२।।
भाषा अनेक पंथ असती अनेक जाती
सर्वांहूनि पवित्र इथली महान माती
भारुनी टाकू धरती भारुनिया नभाला ।।३।।
अपमान सोसण्याचा झाला असे युगान्त
नच घेऊ पाय मागे आला जरी कृतान्त
हिंदुत्व अश्व विजयी जग जिंकण्या निघाला ।।४।।
उत्तुंग झेप घेऊ गरुडा समान गगनी
एकात्म गीत गाऊ मतभेद संपावोनि
सामर्थ्य सर्व आता लावू चला पणाला ।।५।।
No comments:
Post a Comment