दिव्य तेज अंतरी आमुच्या अंधाराचे भय न कुणा
आसमंत व्यापून निनादे हिंदुगर्जना पुन्हा पुन्हा ।।धृ०।।
देशाला विकलांग कराया शत्रुचे थैमान चालले
स्वैरपणाने वैर मांडूनि जरी स्वकियांनीं इमान विकले
दिग्विजयाचे यात्रिक आम्ही स्पर्श आमुचा शिखरांना ।।१।।
जीवन वैभव इथे नांदले सुखशांतीचे समृद्धीचे
अमृतवेडे पुत्र अलौकिक लेणे प्रिय भारतभूमीचे
देवत्वाचे रूप शुभंकर या धरतीच्या कणाकणा ।।२।।
कोणी नाही येथे दुर्बल अथवा कोणी नाही हतबल
साधनेतुनी आम्ही कमविले कणखर मनगट प्रखर मनोबल
निर्धाराने टाकू पाऊल ओळखूनी संघर्षखुणा ।।३।।
No comments:
Post a Comment