विराट हिंदु राष्ट्राचा या पुन्हा घुमावा जयजयकार
सुखात त्याच्या सौख्य आमुचे हाच असावा एक विचार ।।धृ०।।
पौरुषयुत ऐश्वर्य पराक्रम त्याग भोग हा सुरेख संगम
अध्यात्माच्या शिखरावरती ऋषी तपस्वी सदैव वसती
दीन दरिद्री दुबळ्यांना हो एकमेव आधार ।।१।।
कुबेर आणि भणंग कोणी या राष्ट्राचे अंगच दोन्ही
ज्ञान आणि विज्ञान येथले समाज सम्मुख सदा राहिले
देवदत्त हे राष्ट्र आमुचे हे मोक्षाचे दार ।।२।।
या राष्ट्राचे सागर निर्झर या राष्ट्राचे कुबेर किंकर
या राष्ट्राचे भविष्य अथवा या राष्ट्राचे अतीत सुंदर
या सर्वांशी एकरूपता असा रुजावा एक विचार ।।३।।
राष्ट्रच अमुचा देव जनार्दन त्याच्या चरणी जीवन अर्पण
व्यष्टी समष्टी एक चिरंतन या तत्वाचे सदैव चिंतन
या अद्वैती विरोत नाती आकांक्षा ही प्रबळ अपार ।।४।।
No comments:
Post a Comment