Friday, July 17, 2020

१७० . हिंदुभूमिच्या परमवैभवा प्रकटविण्या साकार

१७० . हिंदुभूमिच्या परमवैभवा प्रकटविण्या साकार

हिंदुभूमिच्या परमवैभवा प्रकटविण्या साकार 
समर्थ होऊन राष्ट्र भरू दे स्वत्वाचा हुंकार ।।धृ०।।

पोषण होवो तनामनांचे अशी हवी समृद्धी 
अन लाभो सकलास त्यासवे निरामयाची सिद्धी 
संस्कारातून राष्ट्रभावना उपजावी अनिवार ।।१।।

स्वयंपूर्ण हो समाज हा अन स्वावलंबि हो व्यक्ती 
समाजभक्ती रुजो मनांतुन अशी घडो अभिव्यक्ती 
व्यक्ति समष्टी एकत्वाचा घडो नित्य संस्कार ।।२।।

जोडुन ठेवी चराचरा जो धर्म सनातन इथला 
आज आपुल्या आचारातुन जगता दावू  चला 
दिव्य अशा युगधर्माचा हो पुनश्च साक्षात्कार ।।३।।

हिंदु हिंदु एकात्म करावा स्नेह अर्पुनी शुद्ध
समर्थ भारत आज घडविण्या संघशक्ति हि सिद्ध 
सामर्थ्यास्तव संघटनेचा घडु दे आविष्कार ।।४।।


No comments:

Post a Comment