Thursday, July 16, 2020

१६६ . आम्ही हिंदु ही तर आमची स्वाभाविक ललकारी रे

१६६ . आम्ही हिंदु ही तर आमची स्वाभाविक ललकारी रे

आम्ही हिंदु ही तर आमची स्वभाविक ललकारी रे
राष्ट्रभक्तिची विराट शक्ती प्रकटे जागृत भारी रे ॥ धृ०।।

मायभूमीच्या कणाकणाचे प्रेम आमुचे प्राणपणाचे
मायभूमीचि सर्व लेकरे समान आम्हा प्यारी रे ॥१।।

ही समता ना ओठावरती बंधुत्वाची हृदयी ज्योती
पहा पहा ही फाडुनी छाती फिटेल शंका सारी रे ॥२।।

परंपरांचा मान राखतो क्षुद्र रुढींचे हीण जाळतो
नव्या युगाचे शिल्प कोरिता अयोग्य उडवू दूरी रे ॥३।।

संतजनांच्या अध्यात्माची वीरवरांच्या हौतात्म्याची
दिव्य प्रेरणा परमार्थाची स्वार्थ अहंता मारी रे ॥४।।

संघटनेने बळ साधावे दारिद्रयाचे पाश तुटावे
समर्थ मंगल जीवन अमुचे विश्वास्तव शुभकारी रे ॥५।।

No comments:

Post a Comment