यशाने दुमदुमवू त्रिभुवने ।।धृ०।।
सकल भेद भारती मिटावे अभिमाने हे राष्ट्र उठावे
आकांक्षांनी यशा आमुची संचरलेली मने॥१॥
कर्तृत्वाच्या विश्वासावर सदैव आम्ही राहू निर्भर
नैराश्याचे ऐकु न येइल यापुढती तुणतुणे॥२॥
मन का दुबळे उदास व्हाया लोह असे का मन गंजाया
का भीषण त्या मुशीत सोने ठरते हिणकस उणे॥३॥
वाळूवरती मीन तडफडे तसेच अमुचे जीवन उघडे
ध्येयसागरी विहरु अथवा क्षणी संपवू जिणे॥४॥
संकल्पाच्या सिध्दीवाचून थांबू आम्ही एकहि न क्षण
ध्येयाच्या त्या अधीन केवळ अमुची ही जीवने॥५॥
धीर वृत्तिचा उंच हिमाचल भीषणतेतही निर्भय निश्चल
नेता ऐसा मिळे अम्हाला काय असे मग उणे॥६॥
No comments:
Post a Comment