Friday, July 10, 2020

१३८ . हे शेत बी माझं बैल बी माझं

१३८ . हे शेत बी माझं बैल बी माझं 

 हे शेत बी माझं बैल बी माझंजोडी खिलारी 
हे गांव बी माझं खपुनी इथं खातो न्याहारी ।।धृ०।।

गावामधी समदं आम्ही एक दिलाच 
कुठं बी असू हिंदू आम्ही एक गुणाचं 
देऊळ राऊळ समदं माझं सोनं शिवारी ।।१।।

माझ्यापरी कितीक गडी हेच बोलती 
बोलाला बी मोल तसं तसंच चालती 
शिवाजीचं राज्य व्हनार मोठं इच्यारी ।।२।।

मायेचा बी पूत येवो झुंज खेळाया 
नांगराचा फाळ घुसलं मुंडी खुडाया 
वेशीवर भगवा झेंडा घेई भरारी ।।३।।

No comments:

Post a Comment