Tuesday, July 14, 2020

१६१ . शंखनाद जाहला असे रणांगणी

१६१ . शंखनाद जाहला असे रणांगणी 

शंखनाद जाहला असे रणांगणी 
हो तयार संगरास सिद्ध होऊनी ।।धृ०।।

संकटांनी आज असे देश घेरला 
सर्व बाजुंनी अनिष्ट अग्नि पेटला 
शत्रु धुंद देश तोडण्या धजावला 
पाहुनी निवांत जना घोर लागला 
जाऊया पुढे आम्ही तयास ठेचुनी ।।१।।

स्वाभिमान रक्षिण्यास बद्ध होऊया 
आर्त दीन बंधुसाठी युद्ध छेडुया 
सर्व शक्ति आजला पणास लाऊया 
पेटवून ज्ञानदीप मार्ग दावुया 
शस्त्र अस्त्र युक्त सर्व होऊया झणी ।।२।।

राष्ट्रभक्ती जागवून जिद्द राखण्या 
एकदा पुनश्च करू सिंहगर्जना 
मायभूमिसाठी लढू हीच वंदना 
ध्येयपूर्तीपायी अर्पू तन्मनाधना 
उच्च स्थानी आपुल्या ध्वजास रोवुनी ।।३।।


No comments:

Post a Comment