हिन्दुभूमि सुतोत्तम होऊ ध्येयव्रती वीरोत्तम होऊ
मातृभूमीच्या कल्याणास्तव कर्ममयी पुरुषोत्तम होऊ ।।धृ०।।
व्यक्तिसुखाची सुवर्णहरिणे सोडू त्यांचा पाठपुरावा
समाजपुरुषा समर्थ करण्या संघटनेचा मार्ग धरावा
लाख संकटे काटे तुडवू आपण धीरोत्तम होऊ ।।१।।
आत्मियतेचे सेतू बांधुन एकवटावी सज्जनशक्ती
कर्तृत्वाचे सागर लंघुन दूर हटावी राक्षसवृत्ती
निशाण मंगल भगवे रोवू आपण विजयोत्तम होऊ ।।२।।
युगायुगांचे जीवनदर्शन धर्मसंस्कृती झाली पावन
हीन विकृती काही जडल्या निःसंशय त्या गाडू आपण
त्यास्तव देऊ अग्निपरीक्षा विशुध्द दिव्योत्तम होऊ ।।३।।
रामराज्य या हिन्दुभूमिवर पुनश्च यावे, यावे लौकर
सद्गुण वैभव नित्य निरंतर सुवर्णभूमी सार्थ खरोखर
संघशक्तीचा यज्ञ चालवू आहुती सर्वोत्तम देऊ ।।४।।
No comments:
Post a Comment