६ . मनामनात जागवा मंत्र हा नवा
मनामनात जागवा मंत्र हा नवा
आपुला समाज नेऊ परमवैभवा ।। धृ ०।।
अंतरात मातृभूचि मूर्ति स्थापिली
शक्ती, बुद्धि, संपदा तिलाच अर्पिली
चित्तही तिचे, तिचीच कीर्ती मान्यता
तिच्या सुखात सौख्य, वैभवात धन्यता
संचरु जगी स्मरु तिचाच जोगवा ।।१।।
शक्ति, शील, ज्ञान, ध्येयनिष्ठ एकता
करु सजीव जीवनात त्याग बंधुता
व्यक्ति व्यक्ति घडविणे मार्ग हा भला
अढळ चालु या व्रतास आचरु चला
संघ वाढवून राष्ट्रधर्म वाढवा ।।२।।
एक आस मार्ग हाच सतत चालणे
धर्म रक्षुनी परस्परांस राखणे
सत्य, न्याय, नीति, पंथ ईश राखती
अंतस्थ होउनी जगास तारिती
कृपेस त्या शिरी धरुन विजय मेळवा ।।३।।
उदो उदो आईचा त्रिभुवनी असो
धुंदवीत दशदिशा मंत्र हा दिसो
संघशक्ति प्रबळ ही प्रकट जाहली
रक्षण्यास हिंदुधर्म सिद्ध जाहली
शासण्या मदांधता विराट जागवा ।।४।।
mp3 request.
ReplyDeleteI need mp3 of manamanaat jagva mantra ha nava...